Desh

तृणमूल काँग्रेस आमदाराच्या हत्येप्रकरणी भाजपच्या मुकुल रॉय यांच्यावर गुन्हा दाखल  

By PCB Author

February 10, 2019

कोलकता, दि.१० (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील  तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांच्या  हत्येप्रकऱणी  भाजपचे नेते मुकुल रॉय यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. तर चारपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच  हंसखली पोलीस ठाण्याचे  ठाणेदार यांचेही निलंबन केले आहे.

सत्यजीत बिश्वास हे कृशनगर मतदारसंघाचे आमदार होते. बिश्वास हे फुलबाडी परिसरात आयोजित सरस्वती पुजेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. पुजा सुरू असतानाच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या.

दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे.