Pimpri

‘तू काळी आहेस, आमच्या घरात शोभत नाहीस’ असे म्हणत केला विवाहितेचा छळ

By PCB Author

April 10, 2021

पिंपरी, दि. १० (पीसीबी) : ‘तू काळी आहेस, आमच्या घरात शोभत नाहीस’ असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 ऑगस्ट 2020 ते 8 एप्रिल 2021 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पिडित महिलेने शुक्रवारी (दि.09) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवि अशोक दयालानी (वय 35), मिना दयालानी (वय 46), कोमल अशोक दयालानी (वय 24) व पुनम अशोक दयालानी (वय 32) (सर्व रा. गांधी नगर, कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेचा ‘तू काळी आहेस, आमच्या घरात शोभत नाहीस’ असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सावर्डे करीत आहेत.