तुला खायला जास्त लागते, घरातील कामे व्यवस्थित करत नाही; असे म्हणत विवाहितेचा छळ

0
241

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – ‘तुझ्या आई-वडिलांनी लग्नात खर्च केला नाही. आमचा मानपान केला नाही. त्यामुळे आता माहेरून तीन लाख रुपये घेऊन ये, तुला खायला देखील जास्त लागते, घरातली कामे देखील व्यवस्थित करत नाहीस’, असे म्हणत विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव शेरीत हा प्रकार घडला असून चंदननगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती रोहन अनील बोरा आणि सासू लता अनिल बोरा यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै 2020 पासून हा प्रकार सुरू होता. लग्नात तुम्ही जास्त खर्च केला नाही, आमचे दहा लाख रुपये खर्च झाले आहेत. तू तुझ्या घरच्या लोकांकडून तीन लाख रुपये घेऊन ये, तुला खायला जास्त लागते, घरातील कामे व्यवस्थित करत नाहीत आणि इतर कारणावरून तिला शिवीगाळ करून वारंवार मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.