Maharashtra

तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड

By PCB Author

July 16, 2018

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – सायन- पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (सोमवारी) सकाळी अकरा वाजता तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. 

सायन- पनवेल हायवेवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीन दिवसांपूर्वी या रस्त्याची पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जे काम केले आहे, ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पावसात हे काम वाहून केले आहे, अशी तक्रार वाहनधारकांतून होऊ लागली आहे.

दरम्यान, आजसकाळी ११ वाजता मनसेने खळखट्याक आंदोलन केले. तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची मनसैनिकांनी तोडफोड केली. कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या प्रकरणात मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.