Maharashtra

“तुम्ही सुद्धा पवारसाहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेन”

By PCB Author

November 25, 2019

मुंबई,दि.२५(पीसीबी) – तुम्ही सुद्धा पवारसाहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेन. कारण उत्तर तुम्हाला नाही आम्हा कार्यकर्त्यांना द्यावं लागतं, अशा शब्दात एका कार्यकर्त्यांने राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना सुनावलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत एका कार्यकर्त्यांने धनंजय मुंडेंना सुनावलं आहे. साहेब मी काल तुम्हाला ७-८ वेळा फोन केला. पण तुमचा फोन नॉट रिचेबल लागत होता. मी कालपासून किती टेंशन घेतलं हे माझ्या घरच्यांनाच माहिती, असं त्या कार्यकर्त्याने म्हटलं आहे.

अजित पवार यांच्या शपथविधीवेळी तिथे ११ आमदार उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे देखील होते. धनंजय मुंडे यांचा फोन दिवसभर बंद होता. यानंतर ते अजित पवारांसोबत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडे आले. तसेच त्यांनी ट्विट करत मी पवारांसोबत, पक्षासोबत असल्याचं स्पष्ट केलं.