Maharashtra

तुम्ही या सामान्य कार्यकर्त्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करणार – धनंजय मुंडे

By PCB Author

December 30, 2019

मुंबई,दि.२९(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असून आमदार धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळावर वर्णी लागली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

राजकीय आयुष्याच्या वळणावर लहान वयात माझ्यावर महत्वाची जबाबदारी सोपवत विश्वास दाखवला ते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि आईप्रमाणे माया लावणाऱ्या प्रतिभा काकी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. साहेब, तुम्ही या सामान्य कार्यकर्त्यांवर दाखविलेला विश्वास सार्थ करणार, असं ट्विट मुंडे यांनी केलं आहे.

राजकीय आयुष्याच्या वळणावर लहान वयात माझ्यावर महत्वाची जबाबदारी सोपवत विश्वास दाखवला ते आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब आणि आईप्रमाणे माया लावणाऱ्या प्रतिभा काकी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. साहेब, तुम्ही या सामान्य कार्यकर्त्यांवर दाखविलेला विश्वास सार्थ करणार.@PawarSpeaks pic.twitter.com/EPopM9MeiC

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 30, 2019

राजकीय जीवनातील एक नवीन जबाबदारी आज स्वीकारत आहे. आईच्या आशीर्वादाने, वडील स्व. अण्णा, आप्पा (स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब) यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत आणि संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचे पूजन करत मी या प्रवासाला सुरवात करत आहे, असं ट्विट त्यांनी सकाळी केलं होतं.