तुम्ही मला काय उखडून टाकणार; शरद पवारांचा अमित शहांवर पलटवार

0
450

इंदापूर , दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तुम्ही मला काय उखडून टाकणार, अशा शब्दांत पवार यांनी शहा यांना प्रत्युत्तर दिले आहे.    

बारामतीत भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत अमित शहा यांनी शरद पवार यांच्या जोरदार हल्ला चढवताना राष्ट्रवादीसह पवार उखडून टाका, असे विधान केले होते. तसेच बारामतीत मुळावर घाव घालण्यासाठी आलो आहे, असे शहा म्हणाले होते. यावर पवार यांनी तोफ डागली. राष्ट्रवादीच्या  बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी इंदापूर येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, देशाचे निम्मे मंत्रिमंडळ बारामतीत प्रचार करून गेले. पण गुजरातमधील अनेक शेठजी येथे येऊन गेले तरी फरक पडणार नाही. अमित शहा यांनी दिलेल्या आव्हानाची  भाषा  येथील  जनतेला रूचलेली नाही, असे  पवार यांनी  सांगितले.