तुम्ही फक्त लंगोट लावा, समोरच्याच्या लंगोटाचे काय करायचे, ते माझ्यावर सोडा – उद्यनराजे

0
556

सातारा, दि. १३ (पीसीबी) –  आमदार शशिकांत शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या  मैदानासाठी लंगोट लावून उतरावे, समोरच्याच्या लंगोटाचे काय करायचे, ते माझ्यावर सोडा, अशा शब्दांत खासदार उद्यनराजे यांनी विरोधकांना सुचक इशारा दिला आहे.

खासदारपदी निवड झाल्याबद्दल उदयनराजे यांचा कोरेगाव मतदारसंघाच्या वतीने आमदार शिंदे यांच्या हस्ते वडाचीवाडी (ता. कोरेगाव) येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्यनराजे बोलत होते.

शशिकांत शिंदे यांना मी आमदार करणारच, असा निर्धार उद्यनराजे यांनी यावेळी बोलून दाखवला. लोकसभा निवडणुकीत मला खिंडीत अडवणाऱ्यांचे काय करायचे, ते मी बघतोच, असे सांगून खासदार उदयनराजे यांनी आमदार शिंदे यांना बळ दिले.

जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणारे आमदार शिंदे यांच्या पाठीशी राहायचे, की भूल थापा देऊन फसवणाऱ्या विरोधकांच्या मागे जायचे, हे जनतेने ठरवावे. आपण सर्वजण ठाम राहिलात, तर विरोधकांचे डिपॉझिट राहणार नाही, असे ते म्हणाले.