Maharashtra

तुम्ही पूर्णपणे मनातून उतरलात मोदीजी! – अभिनेता प्रियदर्शन जाधव

By PCB Author

May 08, 2019

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पंतप्रधान  मोदी माझ्या मनातून उतरले आहेत,  असे ट्विट अभिनेता प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. मोदी यांनी राजीव गांधींबद्दल एक विधान केले होते, त्यावरून विरोधकांकडून मोदीवर टीकेची झोड उठवली जात होती. आता प्रियदर्शन जाधवनेदेखील मोदी यांच्यावर नाराजी व्यक्त् केली आहे.  

प्रियदर्शनने  एक ट्विट केल आहे.  यात म्हटले आहे की, राजीव गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे    तुम्ही पूर्णपणे मनातून उतरलात मोदीजी! सामान्य माणसाला काहीच कळत नाही, अशा भ्रमात राहू नका. ही तीच माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली आणि काँग्रेसला घरी बसवलं, असे जाधव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  याशिवाय  बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही,  असा टोलाही प्रियदर्शनने लगावला आहे.

दरम्यान, तुमच्या वडिलांना ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन बनवले होते. मात्र बघता बघता भ्रष्टाचारी नंबर १ म्हणून त्यांचा अंत झाला. जो अहंकार तुम्ही बाळगत आहात, त्यातच तुमचाही अंत होईस. हा देश चुका माफ करतो. मात्र विश्वासघात करणाऱ्याला कधीच क्षमा करणार नाही,  असे  मोदी यांनी एका प्रचारसभेत म्हटले होते.