‘तुम्ही आमच्या घरावर दगड का मारले’ असा प्रश्न करत केली मारहाण; गुन्हा दाखल

0
412

चिंचवड, दि.२ (पीसीबी) : चिंचवड येथील विद्यानगर येथे गुरुवारी (दि.31) रात्री साडे अकरा वाजता दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीच्या घटनेत आता परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी विक्रम भंवरसिंग राजपूत (वय 22, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ‌ त्यानुसार तिफाना स्पेशल काळे, करण स्पेशल काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, किरण स्पेशल काळे व गब्बर पवार (सर्व रा. विद्यानगर, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिफाने काळे फिर्यादी विक्रम यांच्या घरासमोर येऊन ‘तुम्ही आमच्या घरावर दगड का मारले असा प्रश्न केला’, त्यावर विक्रम यांनी आम्ही दगड मारले नसल्याचे सांगितले. त्यावर आरोपी तिफाने यांनी तु घराबाहेर ये बघतेच तुला असा दम भरला. फिर्यादी विक्रम आरोपीच्या पाठिमागून त्यांच्या घराजवळील खदाणीजवळ गेला त्यावेळी आरोपीची दोन मुले व मेव्हणा हातात लोखंडी कोयता घेऊन उभे होते.

फिर्यादी याठिकाणी गेला असता आरोपींनी त्यांला शिवीगाळ करत कोयत्याने त्याच्यावर वार केले फिर्यादी यांनी ते चुकवले, फिर्यादी यांचा बचाव करण्यासाठी तिथे आलेल्या त्यांचा मुलगा व मुलाचा मित्र यांना देखील आरोपीने कोयत्याने मारहाण केली. याहणामारीत फिर्यादी तसेच त्यांचा मुलगा व मुलाचा मित्र कोयत्याचे वार केल्याने गंभीर जखमी झाले. याच प्रकरणी तिफाना स्पेशल काळे (वय 48, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी देखील पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम भंवरसिंग राजपूत, अंकुर आजेशाने पवार, रोहित कुरमे व अजय काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आकाश भंवरसिंग राजपूत याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तिफाना यांच्या घरावर दगड पडू लागल्याने त्या व त्यांचे पती स्पेशल काळे हे बाहेर येऊन शिवीगाळ करायला लागले. यावेळी त्यांनी चार आरोपींना तिथून पळून जाताना पाहिले. आरोपी विक्रम व आकाश हातात तलवार आणि कोयता घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेले. आरोपी विक्रमने हातातील कोयता तिफाना यांच्या डोक्यात मारला. त्यानंतर फिर्यादी यांची मुलं या भांडणाचा आवाज ऐकून बाहेर आले. आरोपींना यांच्यावर देखील वार करत त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.