Maharashtra

तुम्हाला गांधींकडे पोहचविण्याची तयारी; हिंदू महासभेची कमल हसन यांना जीवे मारण्याची धमकी

By PCB Author

May 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असं वक्तव्य करणारे अभिनेते कमल हसन यांना अखिल भारतीय हिंदू महासभेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी सोमवारी मेरठमध्ये ‘नथुराम गोडसे यांना दहशतवादी बोलणारे मुर्ख आणि हिंदुच्या नावावर कलंक ‘आहेत अशी टीका केली

नथुराम गोडसेंच्या नावावर कमल हसन यांच्याकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे. दहशतवादी कृत्यांना समर्थन देणारे कमल हसन, फारुख अब्दुला, नवज्योत सिंग सिद्धू आणि मेहबुबा मुफ्तीसारखे लोक आहे. जे दहशतवाद्यांचे रक्षण करतात . तसेच सवंग लोकप्रियतेसाठी नथुराम गोडसे यांचे नाव दहशतवादासोबत जोडण्याचे काम केले त्यामुळे हसन यांच्या हत्येसाठी ते स्वत:च जबाबदार असतील. नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि राहतील. कमल हसन यांनी गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसनला दिला आहे.

चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हसन नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असं वक्तव्य केले होते . या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ माजली . यावेळी बोलतांना कमल हसन म्हणाले की , या मतदारसंघात मुस्लिमांची संख्या जास्त आहे म्हणून मी गोडसेला दहशतवादी म्हणत नाही, तर मी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर उभा राहून हे बोलत आहे. कारण, खरोखरच स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा गोडसेच होता, असे म्हणाले होते .