तुमच्या बंदुकीतील गोळ्या संपतील पण आम्ही देश सोडून कुठेही जाणार नाही – ओवैसी

0
368
New Delhi: All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM) President Asaduddin Owaisi speaks in the Lok Sabha during the Monsoon Session of Parliament, in New Delhi on Monday, July 23, 2018. (LSTV GRAB via PTI)(PTI7_23_2018_000061B)

हैदराबाद,दि.३१(पीसीबी) – नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात विरोध करणाऱ्यांनी देश सोडून जावं, असं वक्तव्य मिरतचे पोलीस अधीक्षक यांनी म्हटलं होतं. त्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एसपी साहेब, तुमच्या वर्दीचा आदर ठेवून आम्ही तुम्हाला सोडत आहोत. पण लक्षात ठेवा , असं असदुद्दीन ओवैसी यांनी पोलीस अधीक्षक नारायण सिंह यांना सुनावलं आहे.

एकदा इंग्रजांनी देशाची फाळणी केली आता दुसरी फाळणी आम्ही होऊ देणार नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात विरोध करणाऱ्यांनी देश सोडून जावं, असं मिरतचे पोलीस अधीक्षक यांनी म्हटलं होतं. त्यावर ओवैसी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.