तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा – सुधीर मुनगंटीवार

0
446

मुंबई,दि.२०(पीसीबी) – “आयुष्यभर शरद पवारांनी मतांचे तुष्टीकरण केलं. खुर्चीसाठी पार्टी फोडली. तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ट्रस्ट स्थापन होतोय. मग आरोपांचे कारण काय?” असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांनी अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टवरुन केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शरद पवारांनी लखनऊमध्ये बोलताना, राम मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन होते मग मशिदीसाठी का नाही, असा सवाल उपस्थित केला होता. त्याला मुनगंटीवारांनी हे उत्तर दिलं आहे.

दरम्यान, भाजपची सूज उतरतेय असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते. त्याबाबतही मुनगंटीवारांनी उत्तर दिलं आहे. “दोन तीन नगरसेवक गेल्याने तारे तोडण्याचे कारण नाही. सत्ता गेल्यानंतरही कोल्हापूरमध्ये माजी खासदार धनंजय महाडिकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे जे भाजपमधून गेले ते मुळात भाजपचे नव्हते. दोन-तीन मंडळी भाजपातून गेल्याने तुमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यांनी राज्यात सेवेचे काम सुरु ठेवण्याकडे लक्ष द्यायला हवे”, असं मुनगंटीवार म्हणाले.