Desh

‘तुमच्या नागपूर भेटीमुळे चर्चांना उधाण’; शर्मिष्ठा मुखर्जींनी प्रणवदांना सुनावले

By PCB Author

June 07, 2018

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नागपूरमधील दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाला आज (गुरूवार) उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आता प्रणवदांची मुलगी आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी  या भाजप प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले आहे. मात्र, शर्मिष्ठा यांनी हे वृत्त निराधार असून त्याचे खंडन केले आहे.  

यावर शर्मिष्ठा यांनी आपले वडील प्रणवदा यांना सुनावले आहे. हे तुमच्या नागपूर भेटीमुळे होत आहे, असे शर्मिष्ठा यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे, ‘आजच्या घटनेवरुन भाजप किती घाणेरडे राजकारण करत आहे, हे तुमच्या लक्षात आले असेल. आजच्या घटनेतून तुम्ही काही तरी समजून घ्याल, अशी अपेक्षा करते. रास्वसंघाच्या कार्यक्रमात तुम्ही दिलेले भाषण भविष्यात विस्मृतीत जाईल. मात्र, तेथील दृश्ये ही कायमसाठी उरतील आणि भविष्यात ते वापरले जातील.

आरएसएसलाही माहित आहे की तुम्ही तुमच्या भाषणात त्यांचे कौतुक कराल. मात्र, हे सर्व विस्मृतीत जाईल. मागे उरतील तर फक्त दृष्यं आणि अफवांचे पीक, जे सातत्याने प्रसारित होत राहिल. नागपूरला जाऊन तुम्ही भाजप-आरएसएसला खोट्या बातम्या, अफवा पसरवणे याची मोठी संधी दिली आहे. आजची घटना केवळ त्याची सुरुवात आहे, असे ‘शर्मिष्ठा यांनी म्हटले आहे.