तुमच्यात दम नसेल, तर मला सांगा, मी तिकडे येतो; नरेंद्र पाटलांचे उद्यनराजेंना आव्हान

0
898

सातारा ,  दि. १३ (पीसीबी) – आपल्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ले झाले आहेत.  तुमच्यात हिंमत असेल, तर तुम्ही सांगा तिथे येईन, असे थेट आव्हान शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे यांना दिले.  पाटील यांनी उद्यनराजेंवर एकेरी शब्दांचा वापर केला. 

महायुतीची प्रचारसभा कोरेगावात  झाली. त्यावेळी पाटील बोलत होते.  साताऱ्यात उदयनराजे यांच्याविरोधात भाजपतून शिवसेनेत आलेले नरेंद्र पाटील यांना  रिंगणात उतरवले आहे.

या सभेत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे यांना अर्वाच्च भाषेचा वापर करत खुले आव्हान  दिले. उदयनराजेंनी केलेल्या विकास कामाबाबत सांगताना त्यांनी दुसऱ्याच्या पोराला आपले नाव का देता, असे म्हणत स्वत:च्या पोराकड लक्ष देण्याचा सल्ला  दिला.

पाटील म्हणाले की, माझ्यावर दोनदा प्राणघातक हल्ले झाले. मला आता मरणाची भीती नाही.  तुम्ही मर्द मराठे आहात. तुमच्यात दम नसेल तर मला सांगा, मी तिकडे येतो, असे एकेरीत उल्लेख करत अर्वाच्च भाषेचा वापर केला.