Pune

तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ, रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार – महादेव जानकर

By PCB Author

March 23, 2019

पुणे, दि. २३ (पीसीबी) – तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या, आम्ही तुमच्यासोबत पण रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहोत,  असे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख व राज्याचे मंत्री महादेव जानकर यांनी आज (शनिवार) येथे म्हटले आहे.  पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली.  यानंतर जानकर बोलत होते.

जावकर म्हणाले की,  रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन आला असता त्यांना म्हणालो, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या.   शिर्डी, परभणीचा उमेदवार तयार आहे. काही मतदार संघ रासपला सोडा आणि तिथे शिवसेना-भाजपसमोर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या, असे मी त्यांना  सांगितल्याचे  जाणकर  म्हणाले.

मला आता मंत्रिपदही नको, एकदा मांडवाखाली जाऊन आलो आहे. आता त्यांनी कोणालाही मंत्रीपद द्यावे. सुजय विखे पहिल्यांदा माझ्याकडे आले होते, मी त्यांना भाजपमध्ये जाण्यास  सांगितले. तिथे तुम्हाला चांगले दिवस येतील आणि तो बिचारा भाजपमध्ये गेला, असेही जाणकर यांनी यावेळी सांगितले.