Maharashtra

तुमचा फोन टॅप होतोय, भाजपच्या माजी मंत्र्यांनीच मला माहिती दिली – संजय राऊत

By PCB Author

January 24, 2020

मुंबई,दि.२४(पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या माजी ज्येष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याचं सांगितलं होतं, असा दावा केला आहे. संजय राऊतांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

भाईसाहेब, माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल, तर स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपून छपून करत नाही. ऐका माझं बोलणं, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

फडणवीस सरकारने आपल्या काळात तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाल्यानंतर राऊतांनी ट्विटरवरुन हा दावा केला आहे. तुमचा फोन टॅप होतोय अशी माहिती मला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.