Notifications

‘तुझे तोंड बंद कर अन्यथा कायमस्वरुपी तुझे तोंड बंद करु’  शेहला रशीदला डॉन रवी पुजारीकडून धमकी

By PCB Author

August 14, 2018

जम्मू, दि. १४ (पीसीबी) – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवरील गोळीबाराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत असताना आता जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीदला माफिया डॉन रवी पुजारीच्या गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेहलाने तीला आलेल्या एसएमएसीचा फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेर केला आहे.