तुकाराम मुंढे आरतीसाठी मंदिरात आले, अन् कारवाई करून गेले

0
3391

नाशिक, दि. १० (पीसीबी) – धडाकेबाज आयएएस अधिकारी व नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे  आज (बुधवार) नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते.  त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसून आले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून मुंढे यांचा पारा चढला. 

आरती झाल्यानंतर  मुंढे यांनी सर्व प्रसाद स्टॉल्सची अचानक पाहणी केली. संध्याकाळपर्यंत प्लास्टिक वापर बंद न केल्यास, दुकाने हटवू, असा इशारा यावेळी मुंढेंनी दिला. त्याचबरोबर मंदिराबाहेरील रस्त्यावर दुकानांनी अतिक्रमण केल्यास कारवाई करण्याचाही इशारा दिला.

नाशिकची ग्रामदेवता कालिका मंदिरात आज सकाळी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना  आरती करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी ८.३० वाजता ते मंदिरात दाखल झाले. मात्र मंदिर परिसरात पाऊल ठेवताच त्यांना प्लास्टिक पिशव्या निदर्शनास पडल्या. त्यामुळे तुकाराम मुंढे यांचा पारा चढला.