‘ती’ चूक करणाऱ्यांचे शरद पवार बाप होते – उध्दव ठाकरे

0
385

नाशिक, दि. १३ (पीसीबी) – अजित पवारांमध्ये हिंमत असेल, तर ती चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेवून सांगावे. विभागाचे प्रमुखांची ती चूक होती, असे ते सांगत असले तरी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणाऱ्यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.  

बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे, ही राष्ट्रवादीची चूक होती, या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला.  येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांनी सूडाने कारवाई करणार्‍यांच्या पार्श्वभागावर लाथ घातली असती. शिवशाहीचे सरकार आल्यानंतर कोणाशीही सूडाने वागू नका, जनतेची कामे करा, सुख-समाधान द्या, न्याय्य-हक्कासाठी आंदोलन करणार्‍यांवर लाठय़ा चालवू नका, असे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना निक्षून सांगितले होते, असे उद्धव म्हणाले.