तीव्र दुःख झाल्याची भावना – महापौर माई ढोरे

0
292

पिंपरी,दि. ४ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय काका साने यांचे आज कोरोनामुळे निधन झाले.लाॅकडाऊन कालावधीत नागरिकांची सेवा करताना त्यांना लागण झाली होती.त्यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाल्याची भावना महापौर उषा ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली.शहराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतांना महापौर माई ढोरे म्हणाल्या श्री साने यांनी नागरिकांच्या हितासाठी अनेक विषय महापालिकेच्या सभागृहात मांडले.