तीन लाखांचा सोन्याचा मास्क

0
293

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात सोन्याचा शर्ट, सोन्याची पॅन्ट असे यापूर्वी जनतेने पाहिले. दोन -तीन किलो सोन्याचे दागिने अंगावर मिरवणारेही शहरात आहेत. आता जगाच्या आगळे वेगळे करायचे म्हणून शंकर कुऱ्हाडे यांनी चक्क सोन्याचा मास्क वापरायला सुरवात केली आहे.

साडे पाच तोळ्याच्या या मास्कसाठी तब्बल दोन लाख 90 हजार रुपये खर्च केले आहेत. आधीच पाच ही बोटात अंगठ्या, मनगटात कडे, गळ्यात सोन्याचा गोफ आणि त्यात आता या मास्कची भर पडलीये. कोरोनाच्या महामरातीत बनवलेल्या त्यांच्या या मास्कमुळं सध्या उलट-सुलट चर्चा ही सुरु आहे, पण या चर्चांना ते भीक घालायला तयार नाहीत.