तिसरी आघाडी करण्यापेक्षा महाआघाडी करु; राजू शेट्टींचा प्रकाश आंबेडकरांना प्रस्ताव

0
632

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे आघाडी, युती करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आज (शनिवार) मुंबईतील राजगृह येथे  बैठक झाली.

यावेळी भाजपविरोधात सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. तिसऱ्या आघाडीपेक्षा महाआघाडी महत्वाची आहे. तिसरी आघाडी करण्यापेक्षा सर्वांना एकत्र घेत महाआघाडी करु, असा प्रस्ताव राजू शेट्टी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर ठेवला. यावेळी आमदार कपिल पाटील आणि ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते.

दरम्यान, भारिप आणि एमआयएमने बहुजन वंचित विकास आघाडी स्थापन केली आहे.  या आघाडीची पहिली जाहीर सभा २ ऑक्टोंबरला औरंगाबाद येथे झाली.  तर राजू शेट्टी हे आंबेडकर-ओवेसींच्या नव्या बहुजन वंचित विकास आघाडीत सहभागी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.