तिरुपती शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू

0
371

तिरुपती, दि.११ (पीसीबी) : तिरुपती येथील ‘रुईया’ सरकारी रुग्णालयात १ कोरोना रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला. ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अवघ्या पाच मिनिटांचा विलंब झाल्याने ही भीषण दुर्घटना घडली.

तिरुपती येथील व्यंकटेश्वर रामनारायण रुईया या शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता होती. सुमारे ४५ मिनिटांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला. तामिळनाडूमधील श्रीपेरुंबुदूर येथून ऑक्सिजन टँकरच्या येण्यास उशीर झाल्याने हे संकट वाढले.

ऑक्सिजनचे सिलिंडर लोड होईपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने ११ रुग्णांना जीव गमावला. ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत झाला आणि त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या इतर अनेक रुग्णांचे प्राण वाचले. रूग्णांची काळजी घेण्यासाठी जवळपास ३० डॉक्टरांना तातडीने आयसीयू येथे पाठविण्यात आले. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.