तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती खालावली

0
392

चेन्नई, दि. ७ (पीसीबी) – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांची प्रकृती खालावत चालली आहे. शरीरातील महत्वाच्या अवयवांचे कार्य मंदावत चालले आहे, असे चेन्नई येथील कावेरी हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कावेरी रुग्णालयाबाहेर द्रमुकच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत चालली आहे.

आज (मंगळवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एमके स्टालिन यांनी कुटुंबियांसह राज्याचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांची त्यांच्या ग्रीनवेस रोड निवासस्थानी भेट घेतली व त्यांना वडिलाच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.

द्रमुकचे नेते टीआर बालू, मुरासोली सेल्वम आणि आय पेरीयासामी सुद्धा यावेळी उपस्थित होते. काल रात्री हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिनद्वारे करुणानिधींची प्रकृती आणखी खराब झाल्याची बातमी दिल्यानंतर आज सकाळपासून रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी होऊ लागली आहे.