तहान लागल्यावर विहीर खोदू नका; अजित पवारांचा गिरीश बापटांना टोला  

0
931

पुणे, दि. १५ (पीसीबी) – गेल्या साडे चार वर्षातील कारभार पाहता सध्याचे राज्यकर्ते पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहेत.  पुण्याला पुरेसे पाणी देण्यासाठी पालकमंत्र्यांमध्ये इच्छाशक्ती  दिसून येत नाही.   जेव्हा तहान लागणार तेव्हा विहीर खोदू नका , असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पालक मंत्री गिरीश बापट यांना लगावला.   

पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ आज (शनिवार) पार पडला. यावेळी पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष  शरद पवार,  उपस्थित होते.

यावेळी पवारांनी  गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला.  पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले. यंदा प्राधिकरणाने पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावर मुख्यमंत्री त्यांच्या विशेष अधिकारात पाण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे पवार म्हणाले.