Chinchwad

तहसीलदारांसमोर तहसील कार्यालयातील लिपिकाला बेदम मारहाण

By PCB Author

October 08, 2020

आकुर्डी, दि. ८ (पीसीबी) – सरकारी कामासाठी पैशांची मागणी करत असल्याबाबत दिलेल्या एका तक्रार अर्जावर तहसीलदारांसमोर चौकशी सुरु असताना तक्रारदाराने तहसील कार्यालयातील लिपिकाला बेदम मारहाण केली. मारहाण करणा-यास पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 7) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास अप्पर तहसीलदार कार्यालय, आकुर्डी येथे घडला. अतुल काळूराम तापकीर (वय 45, रा. चोविसावाडी, च-होली बुद्रुक, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आकुर्डी येथील तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड हद्दीतील जमीन संकलानाचा कार्यभार आहे. निकम वस्ती, च-होली येथील जगनाथ ताजणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत त्यांच्या जमिनीचे बिनशेती परवाना करण्यासाठी तहसील कार्यालयात 29 जुलै रोजी अर्ज केला होता. त्याबाबत 7 सप्टेंबर रोजी अतुल तपकीर यांना विनिश्चीती सनद देखील देण्यात आली. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी ‘बिनशेती परवाना देण्यासाठी फिर्यादी  हे प्रती गुंठा पाच हजार रुपयांची मागणी करत आहेत, असा अतुल तपकीर यांनी उपविभागीय अधिका-यांकडे अर्ज केला. तो अर्ज चौकशीसाठी उपविभागीय कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे आला. चौकशी करण्यासाठी अतुल तापकीर यांना 1 ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आले. मात्र तापकीर आले नाहीत. तापकीर 7 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात आले. तापकीर यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करत असताना यांना विचारले असता ‘त्यांना त्यांचा बिनशेती परवाना दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे मागण्याचा प्रश्नच येत नाही’ असे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावरून चीढून तापकीर यांनी फिर्यादी लिपिक यांना तहसीलदारांसमोर कानाखाली मारली.  यांना तहसीलदारांच्या केबिनवर ढकलून देत शिवीगाळ केली.  हे करत असलेल्या सरकारी कामात अडथला आणला. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.