Banner News

तहसिलदाराकडे कोट्यवधींचे घबाड, नोटा पाहून अधिकाऱ्यांचे डोळे फिरले

By PCB Author

August 17, 2020

हैद्राबाद, दि. १७ (पीसीबी) –  आपल्या देशात महसुल आणि गृह खात्याचा भ्रष्टाचारात पहिला-दुसरा क्रमांक लागतो. आजवर अनेक अधिकारी – कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने छापे टाकले, कोट्यवधी रुपयेंचे काळे धन मिळाले. हैद्राबाद शहरातील तहसिलदारसुध्दा असाच कोट्यधीश असल्याचे दिसले.

हैद्राबाद शहरातील तहसीलदाराच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंध विभागा (एसीबी) ने छापा टाकला. तपासा दरम्यान सापडलेला काळा पैसा बघुन एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही डोळे फिरले. हैद्राबादपासून विलगीकरण केलेल्या माकानगिरी या जिल्ह्यातील तहसीलदार बलराजू नागराजू यांच्या घराबर एसीबीने छापा टाकलाय. जमिन खरेदी-विक्री व्यवहारात सहकार्य करण्यासाठी तहसीलदाराने 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा टाकून त्यांच्यावर कारवाई केली आहे.

तहसीलदार बलराजू नागराजू यांच्यासोबत एका ग्रामसेवकालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. बी. साईराज असं त्या ग्रामसेवकाचं नाव आहे. 28 एकर जमिनीच्या व्यवहारात ही लाच घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एसीबीच्या पथकाने लाचेची रक्कम मोजल्यानंतर तेही आश्चर्यचकित झाले आहेत. एसीबीकडून हैदराबादचे प्रमुख महसूल व निवासी परसरातील तहसीलदाच्या घरावर हा छापा टाकण्यात आला.