Pune Gramin

तळेगाव येथे अज्ञात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून

By PCB Author

May 21, 2019

तळेगाव, दि. २१ (पीसीबी) – इंदोरी ते जांभोळे गावा दरम्यान एका अज्ञात तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करुन खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील इंदोरी ते जांभोळे गावा दरम्यान रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार केलेल्या अवस्थेत मृतदेह  आढळून आला. याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली. तरुणाचे वय अंदाजे २० ते २५ वर्ष आहे. त्याच्या डोक्यावर आणि पोटावर धारदार हत्यारांनी वार केलेले आहेत. त्याची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरु आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.