तळेगाव येथील विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0
641

तळेगाव, दि. १९ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेजच्या मागे असलेल्या भावे विहिरीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. तळेगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १६) सकाळी सव्वादहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेजच्या मागे असलेल्या भावे विहिरीमध्ये काही स्थानिक नागरिकांना अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. तळेगाव पोलीसांनी घटना स्थळी धाव घेत तपासाला सुरुवात करत मृतदेह ताब्यात घेतला. मृताचे वर्णन पुढील प्रमाणे वय अंदाजे ४५-५० वर्षे, रंग गोरा, दाढी वाढलेली, अंगामध्ये काळे पांढरे पट्टे असलेला टीशर्ट, काळ्या रंगाची पँट. मृताच्या डाव्या हातामध्ये स्टीलचे कडे आहे. वरील वर्णनाच्या इसमाची माहिती कुणाला असल्यास तळेगाव पोलीस ठाण्यात ९८२३२१३८२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.