Notifications

तळेगावात सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाला दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना अटक

By PCB Author

February 10, 2019

तळेगाव, दि. १० (पीसीबी) – सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाला तिघाजणांनी सोन्याचे बनावट दागिने देऊन तसेच दुप्पत पैशांचे आमिष दाखवून दहा लाख रुपयांना गंडा घातला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला यश आले आहे. उर्से टोल नाक्याजवळ ही फसवणुकीची घटना घडली होती.