तळेगावात विवाहित शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर केला अत्याचार; पत्नीने मात्र फायदा घेत दोघांना केले ब्लॅकमेल

0
4821

तळेगाव, दि.१६ (पीसीबी) – एका विवाहित शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर अत्याचार केला. तसेच तिच्याकडून ४० हजार रुपये उकळले. ही बाब पीडित शिक्षिका शिक्षकाच्या घरच्यांना सांगण्यासाठी गेला असता शिक्षकाच्या पत्नीने त्या दोघांचे फोटो काडून १० लाख रुपयांची खंडणी मागीतली. हा धक्कादायक प्रकार २९ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०१८ दरम्यान घडला.

याप्रकरणी पीडित २९ वर्षीय शिक्षिकेने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल गायकवाड आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२९ सप्टेंबर) ते सोमवार (दि.१०) डिसेंबर २०१८ दरम्यान आरोपी शिक्षक अमोल गायकवाड याने पीडित शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच शिक्षिकेला तळेगाव येथील अलंकार लॉज आणि विविध ठिकाणी नेऊन तिच्याबरोबर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने घरचे कारण सांगून पीडितेकडून ४० हजार रुपये उकळले. पीडितेला आरोपीचे लग्न झाल्याचे समजताच ती त्याच्या घरी गेली. मात्र आरोपी अमोल याच्या पत्नीने त्या दोघांचे फोटो काडून १० लाखांची खंडणीची मागणी केली. यावर पीडितेने आरोपी अमोल आणि त्याच्या पत्नीविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.