तळेगावात लाखाची घरफोडी

0
597

तळेगाव, दि. १४ (पीसीबी) – घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने कुलुप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनी सोन्याचे दागिने आणि रोख ५० हजार असे एकूण १ लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शुक्रवार (दि.१२) ते शनिवारी (दि.१३) सकाळी आठच्या दरम्यान दारुब्रे सांगवडे रोड, खळवडी वस्ती येथे घडली.

याप्रकरणी बापु पांडुरंग भोंडवे (वय ५६, रा. सांगवडे रोड, खळवडी वस्ती, दारुब्रे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बापु भोंडवे यांचे खळवडी वस्ती येथे घर आहे. शुक्रवार (दि.१२) ते शनिवारी (दि.१३) दरम्यान ते घराला कुलुप लावून कामा निमित्त बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने त्याच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. तसेच कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनी सोन्याचे दागिने आणि रोख ५० हजार असे एकूण १ लाखांचा ऐवज चोरुन नेला. तळेगाव दाभाडे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.