Pune Gramin

तळेगावात महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून दुचाकीस्वार पसार

By PCB Author

June 03, 2019

तळेगाव, दि. ३ (पीसीबी) – भाजी घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ९२ हजार रुपये किमतीचे ४ तोळे वजनी सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि.२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकात घडली.

याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ३३ वर्षीय फिर्यादी महिला या भाजी घेण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या शिवाजी चौक येथे आल्या असता मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ९२ हजार रुपये किमतीचे ४ तोळे वजनी सोन्याचे मंगळसुत्र हिसका मारुन नेले. तळेगाव दाभाडे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.