तळेगावात पिस्तुलीचा धाक दाखवून पाच जणांनाकडील पावनेतील लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी केला लंपास

0
1146

तळेगाव, दि. ५ (पीसीबी) – पिस्तुलीचा धाक दाखवून ८ ते १० जणांची टोळी असलेल्या दरोडे खोरांनी मिळून पाच जणांनाकडील रोख रक्कम, सोन्याची चैन आणि मोबाईल असा एकूण २ लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना सोमवारी (दि.२९ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास सुदूंबरे गावाच्या हद्दीतील बाबाजी गाडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये घडली.

याप्रकरणी राजु सिताराम दरवडे (वय ४०, रा. कान्हेवाडी, इंदोरी) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २० ते २५ वयोगटातील ८ ते १० अनोळखी दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २९ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास सुदूंबरे गावाच्या हद्दीतील बाबाजी गाडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये फिर्यादी दरवडे हे त्यांच्या काही मित्रांसोबत बसलेले असताना २० ते २५ वयोगटातील ८ ते १० अनोळखी दरोडेखोर तेथे आले. त्यांनी त्यांच्याजवळील पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी दरवडे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, रोख रक्कम १ लाख रुपये, १ मोबाईल. तसेच फिर्यादी यांच्या मित्र राहुल येवले याच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन, एक मोबाईल आणि इतर तिघांचे तीन मोबाईल असे एकूण २ लाख ६७ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन फरार झाले. फिर्यादीने याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात रविवारी (दि.४) तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.