Pune Gramin

तळेगावात दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

By PCB Author

April 11, 2019

तळेगाव, दि. ११ (पीसीबी) – दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना वडगावफाटा ते नवलाख उंब्रे रस्त्यावर घडली.

भुषण राजेंद्र खैरे (वय २५, रा. साई गार्डन, रेल्वे स्टेशनजवळ, वडगाव मावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.७) रात्री पावणेतीनच्या सुमारास भुषण हा त्याच्या मोपेड दुचाकी (क्र.एमएच/१४/जीक्यु/१८३४) वडगावफाटा ते नवलाख उंब्रे रस्त्यावरुन वेघाने चालला होता. यावेळी त्याची दुचाकी घसरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या अल्युमिनिय बॅरीकेडला जाऊन धडकली. यामध्ये भुषण गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.