Pune Gramin

तळेगावात गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक

By PCB Author

October 31, 2018

तळेगाव, दि. ३१ (पीसीबी) – तळेगाव सोमाटणे फाटा येथे गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.३०) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली.

विशाल उर्फ गोट्या नथु चव्हाण (वय २३, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव) असे गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि सहायक पोलीस निरीक्षक अजित दळवी यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, आरोपी विशाल हा सोमाटणे फाटा येथे येणार असून त्यांच्याजवळ गावठी कट्टा आहे. यावर तळेगाव पोलीस ठाण्यातील स्टाफने सोमाटणे फाटा येथे सापळा रचून विशाला याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतूस आढळून आले. पोलीसांनी त्यासह विशाल याला अटक करुन त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.