तळेगावात कोयत्याचा धाक दाखवून एकाच्या गळ्यातील ३ तोळ्याची सोन्याची चैन तिघा चोरट्यांनी पळवली

0
431

तळेगाव, दि. १४ (पीसीबी) – दुचाकीवरुन आलेल्या तिन चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून एकाच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची ३ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्ती चोरुन नेली. ही घटना बुधवारी (दि.१३) सायंकाळी आठच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी येथील अॅक्सेस अॅग्रो कंपनीजवळ घडली.