Pune Gramin

तळेगावातील ‘हाण्या’ खून प्रकरणातील चौघा आरोपींना अटक; एक आरोपी अल्पवयीन

By PCB Author

June 26, 2019

तळेगाव, दि. २६ (पीसीबी) – स्वप्नील उर्फ हाण्या सूतार या तरुणाच्या डोक्यात कोयता, चॉपरने वार करुन तसेच दगड डोक्यात मारुन निर्घृण खून करणाऱ्या चौघा आरोपींना गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांनी मंगळवारी (दि.२५) अटक केली.

स्वप्नील उर्फ हाण्या मधूकर सूतार (वय २०, रा. शिव कॉलनी, वराळे ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बाबा उर्फ साहिल लक्ष्मण शिंदे (वय १९, रा. यशवंतनगर, तपोधाम कॉलनी, अभिलाशा सोसायटी, तळेगाव स्टेशन), सौरभ जालिंदर खेडेकर (वय १८, रा. खांडगे पेट्रोलपंपासमोर, वृदावन हॉटेलचेवर, तळेगाव दाभाडे), अमित बाळासाहेब साठे (वय १९, रा. साई समर्थनगर, विशाल लॉन्सजवळ, वडगाव मावळ) आणि साई अभिजीत म्हाळसकर (वय १७, रा. म्हाळसकरवाडी, तळेगाव स्टेशन) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी येथून काही दिवसांपूर्वी स्वप्नील उर्फ हाण्या मधूकर सूतार हा तरुण बेपत्ता झाला होता. त्याचा तपास गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता स्वप्नील याला त्यांनी फसवून टाकवे रोड इंद्रायणी नदीच्या कडेला नेले. तेथे त्याच्या डोक्यात कोयता आणि चॉपरने वार केले. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला. चौघा आरोपींना अटक करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राजमाने तपास करत आहेत.