Pune Gramin

तळेगावातील भेगडे आळीत २ लाखांची घरफोडी

By PCB Author

April 27, 2019

तळेगाव, दि. २७ (पीसीबी) – घराचा दरवाजाचा कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. तसेच घरात ठेवलेले ४८ ग्रॅम वजनी सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम ९० हजार रुपये असा एकुण १ लाख ९६ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवार (दि.२५) शनिवारपेठ, भेगडेआळी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी संतोष सुदाम टकले (वय ४१, रा. १९६, शनिवारपेठ, भेगडेआळी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष हे भेगडे आळीत राहतात.  गुरुवारी त्यांचे घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. तसेच घरात ठेवलेले ४८ ग्रॅम वजनी सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम ९० हजार रुपये असा एकुण १ लाख ९६ हजारांचा ऐवज चोरुन नेला. तळेगाव दाभाडे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.