तळेगावमध्ये लिफ्टच्या खड्ड्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

0
895

तळेगाव, दि. २२ (पीसीबी) – नवीन इमारतीमध्ये लिफ्टसाठी केलेल्या खड्ड्यात पडून एका तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.२१) सायंकाळच्या सुमारास तळेगाव-चाकण रस्त्यावरील क्लासिक बिल्डिंग येथे घडली.

तनिशा नारद निषाद (वय ३, रा. तळेगाव, मूळ रा. छत्तीसगड) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारद निषाद हे पत्नीसह तळेगाव-चाकण रस्त्यावरील क्लासिक बिल्डिंग येथे मजुरीचे काम करतात. ते कामासाठी छत्तीसगडहून तळेगाव येथे आले आहेत. त्यांची तीन वर्षांनी चिमुकली तनिशा सोमवारी दुपारी बांधकाम साईटवर खेळत होती. खेळता-खेळता ती लिफ्टच्या खड्ड्यात पडली. बांधकामाला पाणी मारताना लिफ्टच्या खड्ड्यात पाणी साचलेले होते. पाचच्या सुमारास तिच्या घरच्यांना तनिशा दिसत नसल्याचे समजले. त्यांनी शोध घेतला असता ती लिफ्टच्या खड्ड्यात बुडालेली आढळून आली. तिला तात्काळ उपचारासाठी सेवाधाम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तळेगाव पोलीस तपास करत आहेत.