तळेगावमध्ये भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्ती केल्याने तरुणावर वार

651

तळेगाव, दि. १७ (पीसीबी) – भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्ती केल्याने एका तरुणावर धारदार हत्याराने वार करण्यात आले आहेत. ही घटना सोमवार (दि.१५) रात्री अकराच्या सुमारास तळेगाव-दाभाडे गावच्या हद्दीतील बौध्दवस्तीजवळ घडली.

रोहित नागराज वळसंगीकर (वय २४, रा. खळवाडी, सोमा भेगडे यांची खोली, तळेगाव-दाभाडे) असे हत्याराचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आकाश सरोदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकराच्या सुमारास तळेगाव-दाभाडे गावच्या हद्दीतील बौध्दवस्तीजवळ भांडणे सुरु होती. ही भांडणे सोडवण्यासाठी रोहित याने मद्यस्ती केली. यावर चिडलेला आरोपी आकाश याने, तुला खूप मस्ती आली आहे, तुला आता जिवंत सोडणार नाही, असे म्हणून रोहित याच्या कानावर आणि पोटावर धारदार हत्याराने वार केले. याप्रकरणी तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात आकाश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.