तळवडे येथे शॉर्टसर्किटमुळे टायर आणि कापसाचे दुकान जळून खाक

0
493

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – तळवडे येथील मोशी-देहुगाव रस्त्यावर असलेले टायर आणि कापसाच्या गाडीचे दुकान आज (बुधवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास जळून खाक झाले.

या घटनेत दोन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशमन दलाचे चार बंब आग विझवण्यासाठी लागले. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.