Bhosari

तळवडे येथील लॉजीस्टीक कंपनीला साडेपाच लाखांचा गंडा घालून कॅशियर फरार

By PCB Author

February 10, 2019

तळवडे, दि. १० (पीसीबी) – लॉजीस्टीक कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अफरातफर करत ५ लाख ५८ हजार ४१४ रुपयांना गंडा घालुक कंपनीत काम करणारा कॅशियर फरार झाला. ही घटना तळवडे येथील सेफ अॅड सिक्युअर लॉजीस्टीक प्रा. लि या कंपनीत १ ऑगस्ट २०१८ ते ३० सप्टेंबर २०१८ दरम्यान घडली.

रामनिवास जगमालसिंह पुनिया (वय ३५, रा. व्हीपीओ कलरी, ता. राजगढ, जी चीरु स्टेट राजस्थान) असे कंपनीला गंडा घालून फरार झालेल्या कॅशियरचे नाव आहे. याप्रकरणी राजीव कमलेश गणेरीवाला (वय ४६, रा. अमर अॅव्हिलॉन ए ६०२, सर्व्हे नं. ६१, घोरपडी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१८ ते ३० सप्टेंबर २०१८ दरम्यान आरोपी रामनिवास हा फिर्यादी यांच्या तळवडे येथील सेफ अॅड सिक्युअर लॉजीस्टीक प्रा. लि या कंपनीत कॅशियर म्हणून कार्यरत होता. यादरम्यान रामनिवास याने अपल्या पदाचा गैरफायदा घेत कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अफरातफर करुन कंपनीला तब्बल ५ लाख ५८ हजार ४१४ रुपयांचा गंडा घातला आणि फरार झाला. देहुरोड पोलीस रामनिवासचा शोध घेत आहेत.