तळवडेमध्ये तरुणाचा दगडाचे ठेचून खून

0
1225

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – तळवडे येथील स्मशानभुमीजवळ एक पुरुष जातीचा २५ ते ३० वयोगटातील तरणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी तळवडे येथील काही स्थानिक नागरिकांना स्मशानभुमीजवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी त्वरीत पोलीसांना याबाबतची माहिती दिली. देहुरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत इसमाचे वय अंदाजे २५ ते ३० असे सांगितले जात आहे. त्याच्या डोक्यात गदड घालून त्याचा खून केल्याचे समोर येत आहे. मयताच्या अंगात निळसर रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.