Bhosari

तळवडेमध्ये जीवेमारण्याची धमकी देऊन तरुणाला जबर मारहाण

By PCB Author

December 21, 2018

तळवडे, दि. २१ (पीसीबी) – लोखंडी पाईपने जबर मारहाण करुन गंभीर जखमी करत तरुणासह त्याच्या भावाला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना बुधवार (दि.१९) रात्री आठच्या सुमारास तळवडे येथे घडली.

याप्रकरणी जखमी मनोहर संभाजी शेलार (वय ३५, रा. तळवडे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश मारुती वाळुंज (रा. तळवडे) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार रात्री आठच्या सुमारास फिर्यादी मनोहर शेलार हे त्यांच्या कारने तळवडे येथील रस्त्यावरुन जात होते. यावेळी आरोपी महेश वाळुंज याने त्याची दुचाकी शेलार यांच्या कारच्या आडवी लावली. तसेच लोखंडी पाईपने शेलार यांना जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. आणि त्याच्यासह त्यांच्या भावाला जीवेमारण्याची धमकी देऊन पसार झाला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महेश याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.