Pune Gramin

तलवारीने केक कापल्याने शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर गुन्हा

By PCB Author

January 29, 2019

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) – वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याने शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (दि.२६) चांदेरे यांचा वाढदिवस होता. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी त्याच्या घराजवळ गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी आणलेले तब्बल ७ ते ८ केक चांदेरेंनी तलवारीने कापले. याप्रकरणी सोमवारी (दि. २८) हिंजवडी पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची दाखल करण्यात आला. घटनेची व्हिडीओ क्लिप पोलिसांनी हस्तगत केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, भररस्त्यात तलवारीने केक कापून दहशत माजवणाऱ्या गुंडांवर चाप बसावा म्हणून काही दिवसांपूर् वीपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी तलवारीने केक कापण्यावर बंदी घातली होती.