“…तर २०२४ च्या निवडणुक भाजपालाही धोका बनू शकते”

0
307

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या ट्विट्समुळे चर्चेत आली आहे. तिने नेहमी अशीच काही वक्तव्य करत असते, ज्यामुळे नवीन कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत असतात. आतापर्यंत कंगना ट्विटरवर राग काढायची, पण आता तिने इंस्टाग्रामवरही आपला राग व्यक्त केला आहे. २०२४ च्या निवडणुकीत ते भाजपालाही धोका बनू शकते, असेही कंगना म्हणाली.

कंगनाने लिहिले की, ‘इन्स्टाग्रामवर सगळेच मूर्ख लोक भरलेले आहेत. येथे ज्यांचा आयक्यू कमी आहे, त्यांचे कौतुक केले जाते. मात्र, यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की येथे छोट्या व्यवसायाला चालना मिळते. परंतु, विरोधक आता याचा चुकीचा वापर करत आहेत. ते भाजपविरूद्ध द्वेष पसरवत आहेत.’

दुसर्‍या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, ‘ही मध्यमवर्गाची टिक-टॉक चर्चा आहे. या मूर्खांचे भांडवलदार, साम्यवादी आणि जिहादींनी अपहरण केले आहे. यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला धोका निर्माण होऊ शकतो. जर या विदूषक फॅशनसाठी शर्टखाली सायकलिंग शॉर्ट्स घालू शकतात, तर मग यांना कशानेही भ्रमित करता येऊ शकते.’

कंगनाने नंतर आणखी एक ट्विट केले आहे, ज्यात तिने पीएम मोदींचे कौतुक केले आहे. कंगनाने लिहिले की, ‘ते परिपूर्ण नेता आहेत, कुणाची बाहुली नाही. मातीचा लेक ज्याने स्वत: साठीच नव्हे, तर भारतासाठी स्वप्न पाहण्याची हिंमत केली. काहीही करा, त्यांचे काहीही नुकसान होणार नाही. ते आणखी उंचीवर जातील आणि तुम्ही जळतच राहाल.

कंगनाने अलीकडेच तापसीबद्दल एक ट्विट केले होते, ज्यात तिने ‘शीमॅन खूप हॅपी होईल’, असे म्हटले होते. मात्र, नेटकऱ्यांना हा शब्द आवडला नाही. असे शब्द वापरल्याबद्दल त्यांनी कंगनाला खूप ट्रोल केले. तथापि, कंगनाने पुन्हा एकदा आपले स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, लोक इतके नकारात्मक कसे विचार करू शकता. मला वाटले की हा शब्द तिच्या रफ अँड टफ लूकला पूरक आहे. पण लोक इतका नकारात्मक विचार कसा करू शकतात हे मला समजत नाही.

कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत नेत्या ‘जयललिता’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. परंतु, त्यानंतर कंगनाने सांगितले होते की, तिचा चित्रपट प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. थिएटरच्या आधी हा चित्रपट कोणत्याही व्यासपीठावर प्रदर्शित होणार नाही.