…तर सरसकट आरक्षण रद्द करा, उदयनराजे यांची मागणी

0
262

सातारा, दि. २७ (पीसीबी) – राज्य सरकारला आरक्षण देता येत नसेल तर सरसकट आरक्षण रद्द करुन गुणवत्तेवर विद्यार्थ्यांची निवड करा, अशी रोखठोक मांडणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. दरम्यान, भाजप आणि रा.स्व.संघाच्या लेखी आरक्षण रद्द करण्याचा विषय आहे त्याल अनुसरूनच उदयनराजे यांची मागणी असल्याने राजकीय वर्तुळात आणि विशेषतः मराठा समाजात काहिशी अस्वस्थता आहे.

आज मराठा समाजाची परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या मुलांनी कुठे जायचे, शेवटी व्यक्ती कोणीही असली तरी शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर मराठा समाजातील मुला-मुलींना चांगले गुण मिळाले तरी त्यांना प्रवेश मिळत नाही. उलट कमी गुण असलेल्यांना प्रवेश मिळतो,असही उदयनराजे म्हणाले आहेत.

उदनराजे यांच्या मागणीमुळे मराठा समाजासह इतर मागास, मागास अशा सर्व आरक्षणवाद्यांचे धाबे दणानले आहेत. जातीवर आधारीत आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर म्हणजेच खऱ्या गरिब, गरजुंना शिक्षण, नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे, अशी जुनीच मागणी पुन्हा पुढे आली आहे. उदयनराजे यांच्या या मागणीला समाजातून पाठबळ मिळू शकते आणि त्यातून मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. भाजप आणि संघाच्या मनातील हा विषय चर्चेत यावा आणि त्यावर मंथन व्हावे अशीही खेळी असल्याचे समजते.

दरम्यान, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी उदयनराजे यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विचारमंथन बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.