Maharashtra

…तर शिवसेनेत प्रवेश करणारा छगन भुजबळ कुणीतरी दुसरा असेल

By PCB Author

August 20, 2019

नाशिक, दि. २० (पीसीबी) – शिवसेनेत जाणारा छगन भुजबळ कुणीतरी दुसरा असेल, अशी तिरकस प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या शिवसेना प्रवेशाबाबत होणाऱ्या चर्चावर दिली आहे.  तसेच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले.    

भुजबळ म्हणाले की,  मी सध्या येवल्यात आहे. तिथे माझ्या पक्षाचे काम करत आहे.  माझ्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या निखालस खोट्या आहेत. छगन भुजबळ शिवसेनेत जात असल्याच्या बातम्या येत असतील, तर तो कोणीतरी दुसरा भुजबळ असेल. मी नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत मुलाचा  मतदारसंघ टिकवण्याचे आव्हान  भुजबळ यांच्यासमोर  आहे. भाजप, शिवसेनेपुढे आपला निभाव लागेल का ? अशी चिंता त्यांना  सतावत असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच त्यांच्या पक्षांतराच्या  चर्चा  सुरू झाल्या आहेत. भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  मात्र,  ही चर्चा स्पष्ट शब्दांत भुजबळ यांनी फेटाळून लावली आहे.